फूलकोबी पिकातील ‘व्हिप टेल’ विकृती
फूलकोबी पिकातील हा रोग नसून ‘मॅालिब्डेनम’ या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरते मुळे ही विकृती दिसून येते. आम्लवर्गीय जमिनीमध्ये या घटकाच्या उपलब्धतेला अडथळे येतात. या विकृतीमध्ये पाने खुरटलेली व अरुंद होतात. पाने चाबकाच्या आकारा सारखी लांब वाढलेली दिसतात.
नियंत्रणात्मक उपाय योजना-
जमिनीची आम्लता ४.५ पेक्षा कमी आढळल्यास जमीनीत चुना मिसळून आम्लता कमी करावी.
अमोनियम किंवा सोडियम मॅालिब्डेट १.२० किलो प्रति हेक्टर जमिनीत मिसळावे.
किंवा गरजेनुसार ०.२५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात पिकावर फवारणी करावी.
Read More...ऐस्परैगस (Asparagus) एक यूरोपियन मूल की फ़सल है। इस फ़सल पर मौसमी लागत के दृष्टिकोन से कृषि अनुसंधान के बाद भारतीय किसान अब साल भर ऐस्परैगस की खेती कर रहे है।
यह सब्जी हृदयरोग, मधुमेह, कैंसर एवं जोड़ों के दर्द आदि विकारों के लिए काफ़ी उपयोगी है।
Read More...निळे हिरवे शेवाळ भात शेतीसाठी उपयुक्त
ज्या प्रदेशात भात हे प्रमुख पीक आहे अशा भागात या पिकासाठी निळया हिरव्या शेवाळाचा( Blue green algae) उपयोग फायदेशीर ठरू शकतो. ही एक तंतुमय एकपेशीय पाण वनस्पती आहे, जी सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून स्वत:चे अन्न तयार करते तसेच हवेतील नत्र स्थिर करून पिकाला उपलब्ध करून देते. ही वनस्पती सर्वसाधारणत: प्रति हेक्टरी ३० किलो नत्र स्थिरीकरण करू शकते.
शेतक-यांकरीता निळे हिरवे शेवाळाचे उत्पादन हा एक चांगला शेतीपुरक व्यवसाय ठरू शकतो.
निळे हिरवे शेवाळ वापरण्याचे फायदे: १) नत्र स्थिरीकरणाचे कार्य चांगले झाल्याने नत्रयुक्त खतमात्रेत बचत करता येते. २) जमिनीत सेंद्रिय पदार्थांची भर पडते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.२ ते ०.३ %
Read More...जगभरात मशरूमच्या अंदाजे २२ हजार प्रजाती आहेत. त्यापैकी २० ते २५ खाद्य प्रजाती आहेत. मशरूममध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. मधुमेह असणा-यांसाठी हा चांगला आहार आहे. मशरूम हा क्रोमीयम चा चांगला स्त्रोत आहे. रक्तातील साखरेची योग्य पातळी राखण्यास हा घटक मदत करतो. यामध्ये कर्बोदकांचे आणि चरबीचे प्रमाणही कमी असते. मशरूममध्ये नैसर्गिक प्रतिजैविके आणि कर्क रोगप्रतिकारक गुणधर्म असतात.
मशरूमपासून तयार करण्यात येणा-या सूप पावडर, लोणचे, आरोग्यवर्धक पेय इत्यादी मूल्यवर्धित उत्पादनांना देशात खूप मागणी आहे.
Read More...केळीवरील करपा रोग (Sigatoka leaf spot)
केळी पिकामध्ये ‘ पानावरील करपा’ या रोगामुळे शेतक-यांना खूप नुकसान सोसावे लागते. या रोगामुळे केळीच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. हा बुरशीजन्य( Psedocercospora musicola) रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव प्रथम झाडाच्या खालील पानांवर आढळून येतो. पानांवर आणि पानाच्या शिरेस समांतर बारीक पिवळसर लांबट गोल ठिपके दिसतात. कालांतराने ठिपके वाढत जातात, त्यांचा रंग तपकिरी काळपट होऊन मध्यभागी राखाडी होतो. रोगाची तीव्रता अधिक असल्यास संपूर्ण पान सुकून जाते. या रोगाच्या वाढीसाठी हवेतील आर्द्रता हा महत्वाचा घटक असतो.
उष्ण दमट हवामान, दवबिंदु, पावसाळी वातावरण, दाट लागवड, पिकाची फेरपालट न करणे, प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक
Read More...भात पिकावरील खोडकिड
भात रोपवाटिका तयार करताना पिकावर खोड किडीचा (Rice steam borer) मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. शेतक-यांना ही किड ओळखणे सोपे असते. याचा पतंग दोन सेंटीमीटर लांब असून समोरील पंख पिवळे असून मागील पंख पांढरे असतात. नराच्या पंखावर ठिपका नसतो. मादी पतंगाच्या पंखाच्या खालील बाजूस प्रत्येकी एक काळा ठिपका असतो.
अळी रोपवाटीकेमध्ये सुरवातीस कोवळया भागावर उपजीविका करून नंतर खोडात प्रवेश करून आतील भाग पोखरते परिणामी रोपाचा गाभा मरतो.
नियंत्रण : १) किडीचे प्रमाण कमी असतेवेळी किडग्रस्त फुटवे मुळांसह काढून घ्यावेत २) प्रादुर्भाव दिसताच प्रति एकरी ट्रायकोडर्मा जापोनिकम या मित्रकिटकाची ३०,००० अंडी एक आठवड्याच्या अंतराने ३ वेळा शेता
Read More...ओळखलंत का मला ?
मी मध्यम ऊंचीचे, पानझड होणारे झाड आहे. मादागास्कर हे माझं मुळ स्थान आहे. तिथुन दर्यावर्दी लोकांनी मला भारताच्या किना-यावर आणले. समुद्राकाठचा कोरड्या हवामानाचा प्रदेश मला खूप मानवतो. माझं खोड सरळ वाढतं पण फारसं जाड नसतं, साल राखाडी रंगाची असते. माझी मुळ जमिनीत जास्त खोल न जाता वरच्या थरातच पसरतात. फांदया नाजुक असून चटकन मोडतात. पावसाळया नंतर हळूहळू पाने गळायला सुरवात होऊन मे महिन्यात मला पूर्ण निष्पर्ण व्हायला होते. उन्हाळयात एप्रिल पासूनच फुलांचा बहार सुरू होतो. केशरी, लाल, तपकिरी रंगाच्या फूलांनी मी भरून जातो ! त्यानं
Read More...ओळखा पाहू मी कोण ?
मी एक बहूवार्षिक सदाहरित झुडुपवर्गीय वनस्पती आहे. कंदमुळ आणि सालीचा रंग तपकिरी मळकट असतो. फूलोरा झुपक्याच्या स्वरूपात येतो. माझी पाने पातळ असतात. मुळांना उग्र वास येतो.
माझ्या मुळांचा वापर अपस्मार व रक्तदाब कमी करणा-या औषधांमध्ये करतात.
ओळखलत का मला ?
मी आहे सर्पगंधा वनस्पती. माझे शास्त्रीय नाव आहे ‘Rauvolfia serpentina’
Read More...ओळखा पाहू मी कोण ?
ब-याच ठीकाणी माझी लागवड मंदिरा भोवतालच्या जागेत केलेली आढळते. माझं मुळस्थान आहे मेक्सिको-ग्वाटेमालाचा प्रदेश. मी मध्यम आकाराचा पानझडी वृक्ष आहे. माझं खोड आणि फांदया मांसल आणि वेडयावाकड्या असतात. साल करडी आणि मऊ असते. खोडाचा तुकडा जरी मोडून लावला तरी चटकन रुजून येतो. माझी एखादी फांदी किंवा पान तोडले तरी तिथून पांढरा चिकट द्रव पाझरतो. संधिवाता वरील उपचारात त्याचा उपयोग करतात. माझी पाने मऊ हिरवीगार आणि लांबट असून त्यांना छोटे देठ असतात मला मार्च ते मे पर्यंत फूलांचा बहर असतो. डहाळीच्या टोकाला फूलांचे गुच्छ येतात. मग करड्या तपकिरी रंगाच्या शेंगा दिसून येतात. फूलाला पाच पाकळया असून, फूले पांढरी पण मध्यभागी पिवळी असतात. काही वेळ
Read More...Jwar/Sorghum
कोरडवाहू ज्वारीला २५ किलो नत्राचा तर बागायती ज्वारीला ६० किलो नत्राचा
दूसरा हप्ता द्या. डवरणीची कामे उरकुन घ्या. ऑगस्टच्या तिस-या आठवड्यात पीक साधारणत: कणीस पोटरीच्या बाहेर पडण्याच्या अवस्थेत असेल.
ज्वारी पिकावरील मावा, तुडतुडे, मिजमाशी, लष्करी अळीचे नियंत्रण करा.
Read More...
Cotton
कपाशीचे पीक फुलावर असताना पाण्याचा ताण पडू देऊ नका. १० दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा एकसरी आड ओलित करावे.
मावा, फूलकीडे, तुडतुडे, पांढरी माशी या किडीपासून पिकाचे संरक्षण करा.
पात्या, फूलगळ कमी करण्यासाठी १ मिली प्लॅनोफिक्स ४.५ लिटर पाण्यात मिसळून २५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.
Read More...Ground-nut
भुईमुगाच्या पिकातील तण काढावेत, पिकात पाणी साठू देवु नये. पाने गुंडाळणा-या अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी.
भुईमुगाच्या पेरणीपासून ३५ दिवसांनी डव-याच्या साहाय्याने पिकाला भर द्यावी, त्यानंतर आंतरमशागतीची कामे करू नयेत.
शेंगातील दाणे चांगल्या प्रकारे भरण्यासाठी ३०० ते ५०० किलो जिप्सम प्रति हेक्टरी आ-या फुटण्याच्या अवस्थेत जमिनीत मिसळून द्यावे.
Read More...Soyabean
सोयाबीन पिकावरील तांबेरा या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉन्टाफ १ लिटर प्रति ८०० लिटर पाण्यात मिसळून एक हेक्टर क्षेत्राकरीता फवारणी करावी. तसेच खोडमाशी व पाने खाणा-या अळीचे नियंत्रण करावे.
Read More...