Kisan Care

Paddy

निळे हिरवे शेवाळ भात शेतीसाठी उपयुक्त

ज्या प्रदेशात भात हे प्रमुख पीक आहे अशा भागात या पिकासाठी निळया हिरव्या शेवाळाचा( Blue green algae) उपयोग फायदेशीर ठरू शकतो. ही एक तंतुमय एकपेशीय पाण वनस्पती आहे, जी सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून स्वत:चे अन्न तयार करते तसेच हवेतील नत्र स्थिर करून पिकाला उपलब्ध करून देते. ही वनस्पती सर्वसाधारणत: प्रति हेक्टरी ३० किलो नत्र स्थिरीकरण करू शकते.

शेतक-यांकरीता निळे हिरवे शेवाळाचे उत्पादन हा एक चांगला शेतीपुरक व्यवसाय ठरू शकतो.

निळे हिरवे शेवाळ वापरण्याचे फायदे: १) नत्र स्थिरीकरणाचे कार्य चांगले झाल्याने नत्रयुक्त खतमात्रेत बचत करता येते. २) जमिनीत सेंद्रिय पदार्थांची भर पडते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.२ ते ०.३ % वाढते. ३) जमिनीचा पोत सुधारतो ४) पिकाच्या वाढीस उपयुक्त अशा वृद्धिसंवर्धकांचा पुरवठा होतो. ५) भात उत्पादनात २ ते ३ क्विंटल ची वाढ होते.

वापर करण्याची पद्धती: भात रोपांची पुनर्लागवड झाल्यानंतर १० दिवसांनी प्रति एकरी १० ते १२ किलो निळे हिरवे शेवाळ संपूर्ण शेतामध्ये सारखे पडेल अशा बेताने टाकावे तसेच टाकून झाल्यावर पाणी ढवळू नये. तीन आठवड्यात शेवाळाची झालेली वाढ जमिनीच्या पृष्ठभगावर दिसून येईल.