Kisan Care

केळीवरील करपा रोग (Sigatoka leaf spot)

केळीवरील करपा रोग (Sigatoka leaf spot)

केळी पिकामध्ये ‘ पानावरील करपा’ या रोगामुळे शेतक-यांना खूप नुकसान सोसावे लागते. या रोगामुळे केळीच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. हा बुरशीजन्य( Psedocercospora musicola) रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव प्रथम झाडाच्या खालील पानांवर आढळून येतो. पानांवर आणि पानाच्या शिरेस समांतर बारीक पिवळसर लांबट गोल ठिपके दिसतात. कालांतराने ठिपके वाढत जातात, त्यांचा रंग तपकिरी काळपट होऊन मध्यभागी राखाडी होतो. रोगाची तीव्रता अधिक असल्यास संपूर्ण पान सुकून जाते. या रोगाच्या वाढीसाठी हवेतील आर्द्रता हा महत्वाचा घटक असतो.

उष्ण दमट हवामान, दवबिंदु, पावसाळी वातावरण, दाट लागवड, पिकाची फेरपालट न करणे, प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष या बाबी रोगाच्या प्रसारास अनुकूल ठरतात. पावसाचे पाणी, जोराचा वारा यामुळे बुरशीचे बीजाणु दूर अंतरापर्यंत वाहून नेले जातात आणि त्यांचा प्रसार झपाट्याने होतो.