Kisan Care

Plumeria Acutifolia. ओळखा पाहू मी कोण ?

ओळखा पाहू मी कोण ?

ब-याच ठीकाणी माझी लागवड मंदिरा भोवतालच्या जागेत केलेली आढळते. माझं मुळस्थान आहे मेक्सिको-ग्वाटेमालाचा प्रदेश. मी मध्यम आकाराचा पानझडी वृक्ष आहे. माझं खोड आणि फांदया मांसल आणि वेडयावाकड्या असतात. साल करडी आणि मऊ असते. खोडाचा तुकडा जरी मोडून लावला तरी चटकन रुजून येतो. माझी एखादी फांदी किंवा पान तोडले तरी तिथून पांढरा चिकट द्रव पाझरतो. संधिवाता वरील उपचारात त्याचा उपयोग करतात. माझी पाने मऊ हिरवीगार आणि लांबट असून त्यांना छोटे देठ असतात मला मार्च ते मे पर्यंत फूलांचा बहर असतो. डहाळीच्या टोकाला फूलांचे गुच्छ येतात. मग करड्या तपकिरी रंगाच्या शेंगा दिसून येतात. फूलाला पाच पाकळया असून, फूले पांढरी पण मध्यभागी पिवळी असतात. काही वेळा फूलावर गुलाबी छटा दिसते. फूलास गोड सुवास असतो. प्रामुख्याने माझी फुले देवपूजेसाठी वापरतात.

आता तरी माझी ओळख पटली का ?

अहो मी आहे देवचाफा ! मला इंग्रजीत ‘टेंपल ट्री’ म्हणतात. बंगाली भाषेत दलामा फूल, तमिळमध्ये अराली म्हणतात. माझं शास्त्रीय नाव आहे ‘प्लमेरिया अॅक्यूटीफोलिया’